निर्माता, कलाकार आणि दिग्दर्शक ओम राउत यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयातील वकील आशीष राय आणि पंकज मिश्रा यांच्याद्वारे साकीनाका पोलीस ठाण्यात संजय दीनानाथ तिवारी यांनी तक्रार दाखल केली होती.
निर्माता आणि दिग्दर्शकांविरुद्ध मुंबईतील एका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतःला सनातन धर्मी असल्याचे सांगणारा एक व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यातील सीजीआय/व्हिआयएफएक्सबद्दल प्रेक्षकांनी आणि चित्रपट समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती.
बिना जनेऊ असलेला राम या नवीन पोस्टरमुळे निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि लोकांमध्ये रागाची भावना दिसून आली.