मुंबई इंडियन्स ही सर्वात यशस्वी IPL संघ

मुंबई इंडियन्स ही भारतीय क्रिकेटच्या इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. या संघाने IPL मध्ये पाच वेळा चॅम्पियनशिप जिंकली आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षीच्या सीझनमध्ये ही फ्रँचायझी चॅम्पियन ठरली होती.

उन्मुक्त चंद आणि कोरी एंडरसन यासारखे खेळाडू मैदानावर येणार

मेजर लीग क्रिकेटमध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेता कर्णधार उन्मुक्त चंद आणि न्यूझीलंडच्या कोरी एंडरसन यासारखे मोठे खेळाडू सहभागी होतील. उन्मुक्त लॉस एंजिल्स नाईट रायडर्स आणि एंडरसन सॅन फ्रॅन्सिस्को युनिकॉर्न्ससाठी खेळताना दिसणार आहेत.

जुलै महिन्यात पहिला सीझन सुरू

लीगचा पहिला सीझन १३ ते ३० जुलै दरम्यान आयोजित केला जाईल. यात ६ संघ सहभागी होतील. या संघांमध्ये डॅलस, सेंट फ्रान्सिस्क, न्यू यॉर्क सिटी, सिएटल, लॉस एंजिलीस आणि वॉशिंग्टन डी.सी. या संघांचा समावेश आहे.

एमआयने मेजर लीग क्रिकेटमधील न्यूयॉर्क फ्रँचायझी खरेदी केली

टूर्नामेंटमध्ये डीसी, केकेआर आणि सीएसके या संघही आहेत, ही मुंबईची पाचवी फ्रँचायझी.

Next Story