यावेळीचा एशिया कप सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात पार पडणार आहे. ६ संघांच्या या १३ दिवसांच्या स्पर्धेत, फायनलसह एकूण १३ सामने होतील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यांच्यासोबत एक संघ क्वालीफाय करून येणार आहे. तर, श्रीलंका, बांगलादेश आणि अफ
मागील आठवड्यातील ESPN क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, एशिया कप स्पर्धेतील बहुतेक सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. परंतु, भारतीय संघाचे सामने UAE, ओमान किंवा श्रीलंका यांपैकी कोणत्याही एका ठिकाणी हलवण्यात येऊ शकतात.
न्यूज एजन्सी ANI च्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर भारत 2023 च्या आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात येणार नाही, तर पाकिस्तान क्रिकेट टीमही भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभाग घेणार नाही.
पीसीबीचे अधिकारी म्हणाले की पाकिस्तानचे सामने श्रीलंका किंवा बांग्लादेशमध्ये होणार आहेत.