ब्राझीलमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: ६४ ठार, UN कडून मानवाधिकार उल्लंघनावर चिंता

ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी ड्रग तस्कर टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत ६४ जणांना ठार केले. ८१ संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकार उल्लंघनावर चिंता व्यक्त केली आहे.

ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियो येथे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी (drug trafficking) टोळीविरुद्ध मोठ्या कारवाईत ६४ लोकांना ठार केले. ८१ जणांना अटक करण्यात आली, शस्त्रे जप्त करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी (UN) मानवाधिकार उल्लंघनावर चिंता व्यक्त केली.

Brazil: ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियो (Rio de Janeiro) येथे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी (drug trafficking) टोळीविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे २,५०० पोलीस कर्मचारी आणि सैनिक सहभागी होते, ज्यांनी मंगळवारी शहराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या टोळीच्या अड्ड्यांवर छापे टाकले. कारवाईदरम्यान, पोलिसांनी फवेलेसमध्ये (favelas) प्रवेश करताच टोळीतील सदस्यांनी गोळीबार सुरू केला, ज्यामुळे हिंसक चकमकी झाल्या.

गोळीबारात ६४ लोकांचा मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, या मोहिमेत किमान ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ब्राझीलच्या इतिहासातील ही सर्वात भीषण (deadliest) पोलीस कारवाई मानली जात आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस आणि टोळीतील सदस्यांमध्ये अनेक तास चकमक सुरू होती, ज्यात दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मोहीम सुरू राहिल्यास मृतांची संख्या वाढू शकते.

ब्राझीलमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: ६४ ठार, UN कडून मानवाधिकार उल्लंघनावर चिंता

संशयितांची अटक

या कारवाईत पोलिसांनी ८१ संशयितांना अटक केली आहे. तसेच, ४२ रायफल्स, मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि अनेक गोळाबारूदही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी या भागात दीर्घकाळापासून अमली पदार्थांची तस्करी आणि खंडणी वसुलीत (extortion) गुंतलेली होती.

ड्रोनने पोलिसांवर हल्ला

सरकारी निवेदनानुसार, टोळीतील सदस्यांनी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा (drone) वापर केला. पेन्हा कॉम्प्लेक्समध्ये (Penha Complex) गुन्हेगारांनी पोलिसांवर ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. या हल्ल्यानंतर पोलिसांना परिसरात सुरक्षा वाढवावी लागली आणि अनेक भाग पूर्णपणे वेढून टाकण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली

ब्राझीलमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: ६४ ठार, UN कडून मानवाधिकार उल्लंघनावर चिंता

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने (United Nations Human Rights Office) या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रिओ डी जेनेरियो येथील पोलीस कारवाईत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू होणे अत्यंत चिंताजनक (alarming) असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. संघटनेने ब्राझील सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी अशा कारवाईमध्ये मानवाधिकार (human rights) सुरक्षित ठेवण्याची खात्री करावी आणि निष्पक्ष चौकशी करावी.

राज्यपालांचे निवेदन 

रिओ डी जेनेरियोचे राज्यपाल क्लाउडियो कॅस्ट्रो यांनी या कारवाईला “नार्को टेररिझम (narco-terrorism)” विरुद्धचे युद्ध म्हटले आहे. ते म्हणाले की, हा कोणताही सामान्य गुन्हा नाही, तर अमली पदार्थ तस्करी आणि खंडणी वसुलीत गुंतलेले एका आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क आहे. ही टोळी डाव्या विचारसरणीच्या जुन्या कैद्यांच्या गटातून विकसित होऊन आता एक संघटित गुन्हेगारी संघटना बनली आहे. या टोळीचे नाव कोमांडो वर्मेल्हो (Comando Vermelho) असून ती रिओमधील अनेक फवेलेसमध्ये (झोपडपट्ट्यांमध्ये) सक्रिय आहे.

Leave a comment