Columbus

iPhone 18: ऍपलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 च्या लॉन्चिंगमध्ये होणार बदल, जाणून घ्या कधी होणार?

iPhone 18: ऍपलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 च्या लॉन्चिंगमध्ये होणार बदल, जाणून घ्या कधी होणार?

ऍपल iPhone 18 बाबत एक धक्कादायक अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये iPhone 17 सिरीजच्या लॉन्चिंगनंतर कंपनी पुढील वर्षी बेस मॉडेल iPhone 18 सादर करणार नाही. मात्र, याचा अर्थ ऍपल हे मॉडेल बंद करत आहे, असा नाही, तर कंपनी आपल्या लॉन्चिंग टाइमलाइनमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे, असे मानले जात आहे. म्हणजेच iPhone 18 चे आगमन निश्चित आहे, परंतु त्यासाठी युजर्सना थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागू शकते.

iPhone 18 ची लॉन्चिंग कधी होणार?

नवीन मीडिया रिपोर्ट्सनुसार iPhone 18 ची लॉन्चिंग 2027 च्या सुरुवातीला होऊ शकते. अशी अपेक्षा आहे की, यादरम्यान ऍपल आपले पहिले फोल्डेबल iPhone देखील बाजारात आणेल. याचा अर्थ असा आहे की, 2026 मध्ये जेव्हा iPhone 18 Air, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सादर केले जातील, तेव्हा बेस मॉडेल iPhone 18 उपलब्ध नसेल.

ऍपलची नवीन रणनीती

टेक इंडस्ट्रीतील जाणकारांचे मत आहे की, ऍपलची ही रणनीती विक्री वाढवण्याच्या उद्देशाने आहे. खरं तर, जर बेस मॉडेल उपलब्ध नसेल, तर ग्राहकांचा कल Pro किंवा Air व्हेरिएंटकडे अधिक असू शकतो. मात्र, ही रणनीती किती प्रभावी ठरेल, याचा अंदाज लॉन्चिंगनंतरच येऊ शकेल.

एक्सपर्ट्सचा अभिप्राय

प्रसिद्ध ॲनालिस्ट मिंग-ची कुओ यांचेही अनुमान आहे की, सप्टेंबर 2026 च्या इव्हेंटमध्ये बेस मॉडेल iPhone 18 सादर केले जाणार नाही. त्यादरम्यान फक्त iPhone 18 Air, Pro आणि Pro Max लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर, GF Securities चे ॲनालिस्ट जेफ पु यांचे म्हणणे आहे की, ऍपलचे पहिले फोल्डेबल iPhone 2026 च्या चौथ्या तिमाहीत प्रोडक्शन स्टेजमध्ये पोहोचेल, त्यामुळे त्याचे लॉन्च 2026 पर्यंत शक्य नाही.

iPhone 17 Air पासून नवी सुरुवात

यावर्षी ऍपल आपल्या iPhone लाइनअपमध्ये मोठा बदल करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी iPhone 16 सिरीजचे Plus मॉडेल बंद करून iPhone 17 Air लॉन्च करेल. याला आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका iPhone म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, iPhone 18 ची वाट पाहावी लागली, तरी ऍपल फॅन्सना त्याबदल्यात फोल्डेबल iPhone आणि नवीन Air मॉडेलसारखे मोठे सरप्राईज मिळू शकतात.

Leave a comment