देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (Maruti Suzuki India Limited) आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांनंतर बाजारात थोडीशी घसरण दिसून आली असली, तरी ब्रोकरेज कंपन्यांनी कंपनीच्या भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. अनेक प्रमुख ब्रोकरेज हाऊसने मारुती सुझुकीच्या शेअरवर ‘Buy’ रेटिंग देऊन आगामी महिन्यांत १३ ते १७ टक्क्यांपर्यंत रिटर्न्सची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शेअर्समध्ये सुरुवातीला घसरण, पण ब्रोकरेजचा विश्वास कायम
मारुती सुझुकीचे शेअर्स १ ऑगस्ट रोजी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे २ टक्क्यांपर्यंत खाली आले. याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या तिमाहीचे (Q1) निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार आले. मात्र, घसरण होऊनही ब्रोकरेज हाऊस या स्टॉकबद्दल आशावादी आहेत. कंपनीची नवीन उत्पादने, वाढती निर्यात आणि उत्तम मिक्स स्ट्रॅटेजीमुळे कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकेल, असे त्यांचे मत आहे.
मोतीलाल ओसवाल यांचा शेअरवर विश्वास
हे सुद्धा वाचा:-
बलात्कार प्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, 2 ऑगस्टला शिक्षेची घोषणा