निक्की तंबोलीने नावाचा गैरवापर आणि स्कॅम प्रयत्नाबाबत दिला इशारा

अभिनेत्री निक्की तंबोली यांनी त्यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून फेक नंबरद्वारे स्कॅम करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली असून चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

टीव्ही आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री निक्की तंबोली यांनी त्यांच्या नावाचा आणि ओळखीचा गैरवापर होत असल्याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना, जवळच्या मित्रांना आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

निक्की तंबोली यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फेक नंबर आणि चॅटविषयी माहिती दिली. त्यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या परिचितांशी संपर्क साधत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, "कोणी माझे नाव आणि फोटो वापरून फेक नंबरवरून लोकांना मेसेज करत आहे. ती मी नाही. कृपया या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा. उत्तर देऊ नका. हा स्कॅम असू शकतो. कृपया हा नंबर रिपोर्ट करा आणि ब्लॉक करा."

त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या नावाने पाठवले जाणारे कोणतेही संदेश त्यांच्याशी संबंधित नाहीत. अशा संदेशांवर विश्वास ठेवणाऱ्यांना फसवणुकीचा धोका संभवतो, असेही त्यांनी नमूद केले.

निक्की तंबोलीने नावाचा गैरवापर आणि स्कॅम प्रयत्नाबाबत दिला इशारा

निक्की यांच्या मते, फेक नंबर आणि सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या जवळच्या मित्रांकडून आणि चाहत्यांकडून आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या स्कॅममध्ये सहसा पैशांची मागणी, बनावट प्रोजेक्ट ऑफर किंवा फेक स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना फसवले जाते. त्यांनी संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये, तसेच संबंधित नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करावा, असे आवाहन केले.

निक्की तंबोली सध्या रिअॅलिटी शो ‘द 50’मध्ये सहभागी आहेत, ज्यामध्ये त्या त्यांच्या बॉयफ्रेंड अरबाज पटेल यांच्यासह दिसत आहेत. दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. यापूर्वी त्या ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच त्यांना ‘बिग बॉस 14’मधून विशेष ओळख मिळाली होती.

 

Leave a comment