झोपताना उशीजवळ चुकूनही ठेवू नका या गोष्टी, होऊ शकतात मोठं नुकसान
बऱ्याच लोकांना रात्री झोपताना व्यवस्थित झोप येत नाही किंवा झोपेत वाईट स्वप्नं पडतात. यामागे वास्तू दोष एक कारण असू शकतं. सगळ्यांसाठी झोप खूप आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. मात्र, धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. लोक दिवसभर काम करून थकून रात्री आपल्या बेडवर झोपायला जातात, तेव्हा त्यांचा सगळा थकवा दूर होतो. बाहेरून आल्यावर ते आपल्या बेडच्या आसपास अनेक गोष्टी ठेवून देतात. पण मान्यता आहे की, झोपताना काही गोष्टी आपल्या आसपास ठेवू नयेत.
बऱ्याच वेळा वास्तू दोष घराच्या बांधकामाशी जोडलेला असतो, तर काही वेळा आपल्या नकळत होणाऱ्या सवयींमुळेही होतो. बेडरूमशी संबंधित वास्तू दोषामुळे रात्री झोपताना त्रास होतो. अनेक लोक रात्री झोपताना काही गोष्टी उशीच्या आसपास ठेवून झोपतात. अनेकदा या गोष्टी ठेवल्याने समस्या वाढतात. या गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता वाढते. कोणत्या गोष्टी उशीजवळ ठेवू नयेत? चला तर मग या लेखात जाणून घेऊया की उशीजवळ काय ठेवू नये.
पर्स किंवा औषधे
वास्तुशास्त्रानुसार, रात्री उशीजवळ पर्स किंवा औषधे ठेवणे शुभ मानले जात नाही. या गोष्टी ठेवल्याने समस्या वाढतात. औषधे ठेवून झोपल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय पर्स ठेवल्याने आर्थिक स्थिती बिघडते.
पाण्याची बाटली
अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशीजवळ पाण्याची बाटली ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, पाण्याची बाटली ठेवल्याने कुंडलीतील चंद्र प्रभावित होतो. चंद्र हा मनाचा कारक असतो.
बूट-चप्पल
रात्री झोपताना अनेक लोक आपल्या बेडखाली किंवा आसपास बूट-चप्पल ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, बूट-चप्पल ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरात तणावाची समस्या वाढते.
आरसा
बिछान्याजवळ किंवा समोरच्या भिंतीवर आरसा लावणे चांगले मानले जात नाही. मान्यता आहे की, यामुळे घरात भांडणाची समस्या वाढते. याशिवाय वैवाहिक जीवनातही अडचणी येतात.
मासिके
मान्यता आहे की, उशीखाली कधीही वर्तमानपत्र किंवा मासिके इत्यादी वाचायच्या गोष्टी ठेवू नयेत. जर व्यक्ती झोपताना या गोष्टी उशीखाली ठेवत असेल, तर त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो.
इलेक्ट्रॉनिक वस्तू
उशीजवळ लॅपटॉप, मोबाईल फोन ठेवू नयेत. या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढते. इतकेच नाही, तर या वस्तूंमधून हानिकारक किरणे बाहेर पडतात, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
तेल
उशीजवळ तेल ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, तेल ठेवल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय कोणत्याही वाहनाची चावी आपल्याजवळ ठेवून झोपल्याने चोरीचा धोका वाढतो.
टीप: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकमान्यतेवर आधारित आहे, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. हे सामान्य लोकांची आवड लक्षात घेऊन येथे सादर केले आहे.
```