आमिर खान प्रोडक्शन्सने त्यांच्या पीरियड ड्रामा चित्रपट ‘लाहोर 1947’च्या प्रदर्शनााची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून, दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्सकडून करण्यात येत आहे. ‘लाहोर 1947’मध्ये अली फजल, शबाना आजमी, प्रीती झिंटा, विकी कौशल, मिथुन चक्रवर्ती आणि करण देओल यांच्याही भूमिका आहेत.
![]()
चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून, गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले आहे. चित्रपटाच्या पटकथेबाबत आमिर खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “ही धरमजींच्या आवडत्या पटकथांपैकी एक होती. त्यांनी ती पाहिली आणि तिचे महत्त्व ओळखले, याचा मला आनंद आहे.”
‘लाहोर 1947’ हा सनी देओल यांचा ‘बॉर्डर 2’नंतरचा पुढील चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आणि निर्मिती काळजीपूर्वक कालखंडाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आली आहे.









