IPL 2026 मध्ये अजिंक्य रहाणे यांच्याकडेच कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व

IPL 2026 सुरू होण्यास 15 दिवसांपेक्षा ककर्णधार म्हणून सीफर्ट आणि रचिन रवींद्र यांसारखे खेळाडू टॉप ऑर्डरमध्ये असतील, तर ब्लेसिंग मुझारबानी यांचा गोलंदाजी विभागात समावेश करण्यात आला आहे. हर्षित राणा दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झाले आहेत.

अजिंक्य रहाणे यंदाही कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 सुरू होण्यास 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना संघाने हा निर्णय कायम ठेवला आहे.

माहितीनुसार, अजिंक्य रहाणे मागील हंगामात संघाचे कर्णधार होते आणि संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाजही ठरले होते. क्रमांक 3 वर फलंदाजी करताना त्यांनी संघाला अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये योगदान दिले. सध्याच्या संघरचनेचा विचार करता रहाणे हेच सर्वात योग्य कर्णधार असल्याचे कोलकाता नाईट रायडर्स व्यवस्थापनाचे मत आहे. मागील हंगामात त्यांनी फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती आणि यंदाही ते टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना संघाचे नेतृत्व करतील.

इंडियन प्रीमियर लीग 2026 साठी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात काही बदल केले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये आता सुनील नरेन, फिन अ‍ॅलन, टिम सीफर्ट आणि रचिन रवींद्र यांचा समावेश आहे. त्यामुळे संघाची सलामी आणि मधली फळी अधिक मजबूत दिसत आहे.

IPL 2026 मध्ये अजिंक्य रहाणे यांच्याकडेच कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व

गोलंदाजी विभागातही बदल करण्यात आला आहे. मागील हंगामात संघात असलेले बांगलादेशचे वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना संघातून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी झिम्बाब्वेचे उंच बांध्याचे वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे हर्षित राणा दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडले आहेत. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या वॉर्म-अप सामन्यात राणा दुखापतग्रस्त झाले होते. संघातील वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची होती. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते.

यंदाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने संघ अधिक संतुलित करण्यासाठी काही नव्या खेळाडूंना समाविष्ट केले. रचिन रवींद्र आणि कॅमेरून ग्रीन यांसारखे ऑलराउंडर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत संघाला बळ देतील. त्यामुळे सामन्यादरम्यान संघाकडे अधिक रणनीतिक पर्याय उपलब्ध राहतील.

 

Leave a comment