काँग्रेसकडून विनोद जाखड यांची NSUI च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राजस्थानमधील विनोद जाया (NSUI) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून त्यांनी वरुण चौधरी यांची जागा घेतली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या विद्यार्थी आघाडी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजस्थानमधील विद्यार्थी नेता विनोद जाखड यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

पक्षाचे संघटन महासचिव सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विनोद जाखड यांची NSUI च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर विनोद जाखड यांनी या पदावर वरुण चौधरी यांची जागा घेतली आहे.

NSUI च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेतृत्वाने अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. विनोद जाखड हे सध्या NSUI च्या राजस्थान राज्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. विद्यार्थी राजकारणात त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यांनी राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

काँग्रेसकडून विनोद जाखड यांची NSUI च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

विनोद जाखड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1994 रोजी राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील मेढ गाव (विराटनगर तहसील) येथे झाला. ते सामान्य दलित कुटुंबातून येतात. चार भावंडांमध्ये ते मोठे असून, सातव्या वर्षी त्यांनी कुटुंबासह जयपूर येथे स्थलांतर केले आणि शिक्षणास सुरुवात केली.

शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी राजस्थान विद्यापीठातून राजकारणशास्त्र विषयात बीए पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्र विषयात एमए केले. सध्या ते राजस्थानी भाषेत एमए शिक्षण घेत आहेत.

शिक्षणासोबतच त्यांनी विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम केले. ते NSUI चे सक्रिय सदस्य राहिले असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी विद्यार्थी राजकारणात आपली ओळख निर्माण केली.

2014 मध्ये ते राजस्थान कॉलेजचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 2018 मध्ये राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत NSUI कडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ऑगस्ट 2018 मध्ये विद्यार्थी संघ अध्यक्ष म्हणून निवडून आले. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची राजस्थान NSUI च्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीनंतर विनोद जाखड यांच्याकडे देशभरातील NSUI च्या कार्यक्रमांचे आणि धोरणांचे संचालन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

Leave a comment