आयसीसीने 2027 वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारी ही स्पर्धा 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2027 या कालावधीत खेळवली जाणार आहे. स्पर्धेत 14 संघ सहभागी होतील आणि एकूण 57 सामने आयोजित केले जातील.
2027 वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर-ए यांचा समावेश आहे. ग्रुप बी मध्ये बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि क्वालिफायर-बी हे संघ आहेत.
विश्वचषकासाठी एकूण 12 मैदानांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत आठ मैदानांवर सामने खेळवले जातील. यामध्ये जोहान्सबर्गचे वाँडरर्स स्टेडियम, सेंच्युरियनचे मैदान, केपटाउनचे न्यूलँड्स, डरबनचे किंग्समीड, गेबेरहाचे सेंट जॉर्ज पार्क, ब्लोमफोंटेनचे मंगांग ओव्हल, पार्लचे बोलँड पार्क आणि बफेलो पार्क यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वेमध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब आणि व्हिक्टोरिया फॉल्स येथील फाले मोसी-ओआ-तुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामने खेळवले जातील. नामिबियाची राजधानी विंडहोक येथील नामिबिया क्रिकेट ग्राउंडचाही आयोजन स्थळांमध्ये समावेश आहे.
यंदाच्या विश्वचषकाची स्पर्धा तीन टप्प्यांत होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात कमी क्रमवारी असलेल्या तीन संघांमध्ये तीन सामने खेळवले जातील.
यानंतरच्या टप्प्यात 12 संघ दोन गटांमध्ये विभागले जातील आणि एकूण 30 सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध सामना खेळेल. दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ पुढील टप्प्यात प्रवेश करतील. याशिवाय दोन्ही गटांमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघांपैकी चांगली कामगिरी करणारा संघही पुढील टप्प्यात प्रवेश करेल.
यानंतर एकूण सात संघ सुपर-7 टप्प्यात पोहोचतील. या टप्प्यातील सामन्यांनंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

पहिला उपांत्य सामना 17 नोव्हेंबर 2027 रोजी आणि दुसरा उपांत्य सामना 18 नोव्हेंबर 2027 रोजी खेळवला जाईल. या सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.
2027 वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना 21 नोव्हेंबर 2027 रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
2 ऑक्टोबर 2027: क्वालिफायर 1 विरुद्ध क्वालिफायर 3, विंडहोक
4 ऑक्टोबर 2027: क्वालिफायर 1 विरुद्ध क्वालिफायर 2, विंडहोक
6 ऑक्टोबर 2027: क्वालिफायर 2 विरुद्ध क्वालिफायर 3, विंडहोक
7 ऑक्टोबर 2027: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, केपटाउन
8 ऑक्टोबर 2027: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, त्शवाने
8 ऑक्टोबर 2027: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, विंडहोक
9 ऑक्टोबर 2027: झिम्बाब्वे विरुद्ध क्वालिफायर ए, बुलावायो
9 ऑक्टोबर 2027: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, केपटाउन
10 ऑक्टोबर 2027: भारत विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग
10 ऑक्टोबर 2027: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर बी, विंडहोक
11 ऑक्टोबर 2027: झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान, बुलावायो
12 ऑक्टोबर 2027: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर ए, पार्ल
12 ऑक्टोबर 2027: न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, कुगोम्पो सिटील
13 ऑक्टोबर 2027: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, विंडहोक
13 ऑक्टोबर 2027: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर बी, पार्ल
14 ऑक्टोबर 2027: भारत विरुद्ध अफगाणिस्तान, त्शवाने
15 ऑक्टोबर 2027: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर ए, ब्लोमफोंटेन
15 ऑक्टोबर 2027: झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हरारे
16 ऑक्टोबर 2027: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, डरबन
16 ऑक्टोबर 2027: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, गेबेरहा
17 ऑक्टोबर 2027: भारत विरुद्ध क्वालिफायर ए, ब्लोमफोंटेन
17 ऑक्टोबर 2027: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर बी, हरारे
18 ऑक्टोबर 2027: ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, कुगोम्पो सिटील
19 ऑक्टोबर 2027: झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान, हरारे
19 ऑक्टोबर 2027: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, डरबन
20 ऑक्टोबर 2027: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, जोहान्सबर्ग
20 ऑक्टोबर 2027: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर बी, हरारे
21 ऑक्टोबर 2027: अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर ए, कुगोम्पो सिटील
22 ऑक्टोबर 2027: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, पार्ल
22 ऑक्टोबर 2027: दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, जोहान्सबर्ग
23 ऑक्टोबर 2027: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, गेबेरहा
23 ऑक्टोबर 2027: बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर बी, त्शवाने
24 ऑक्टोबर 2027: झिम्बाब्वे विरुद्ध भारत, व्हिक्टोरिया फॉल्स
25 ऑक्टोबर 2027: ए 2 विरुद्ध बी 3, जोहान्सबर्ग
26 ऑक्टोबर 2027: बी 1 विरुद्ध ए 3, गेबेरहा
27 ऑक्टोबर 2027: बी 2 विरुद्ध एबी 4, त्शवाने
28 ऑक्टोबर 2027: ए 1 विरुद्ध ए 2, व्हिक्टोरिया फॉल्स
29 ऑक्टोबर 2027: बी 1 विरुद्ध बी 3, कुगोम्पो सिटील
30 ऑक्टोबर 2027: ए 3 विरुद्ध एबी 4, व्हिक्टोरिया फॉल्स
31 ऑक्टोबर 2027: बी 2 विरुद्ध ए 1, जोहान्सबर्ग
1 नोव्हेंबर 2027: ए 2 विरुद्ध बी 1, व्हिक्टोरिया फॉल्स
2 नोव्हेंबर 2027: बी 3 विरुद्ध एबी 4, केपटाउन
3 नोव्हेंबर 2027: बी 2 विरुद्ध ए 3, डरबन
4 नोव्हेंबर 2027: ए 1 विरुद्ध बी 1, पार्ल
5 नोव्हेंबर 2027: ए 2 विरुद्ध एबी 4, डरबन
6 नोव्हेंबर 2027: बी 2 विरुद्ध बी 3, ब्लोमफोंटेन
7 नोव्हेंबर 2027: ए 1 विरुद्ध ए 3, केपटाउन
8 नोव्हेंबर 2027: बी 1 विरुद्ध एबी 4, डरबन
9 नोव्हेंबर 2027: बी 2 विरुद्ध ए 2, गेबेरहा
10 नोव्हेंबर 2027: ए 3 विरुद्ध बी 3, ब्लोमफोंटेन
11 नोव्हेंबर 2027: ए 1 विरुद्ध एबी 4, गेबेरहा
12 नोव्हेंबर 2027: बी 2 विरुद्ध बी 1, केपटाउन
13 नोव्हेंबर 2027: ए 2 विरुद्ध ए 3, ब्लोमफोंटेन
14 नोव्हेंबर 2027: ए 1 विरुद्ध बी 3, डरबन
17 नोव्हेंबर 2027: उपांत्य सामना 1, केपटाउन
18 नोव्हेंबर 2027: उपांत्य सामना 2, त्शवाने
21 नोव्हेंबर 2027: अंतिम सामना, जोहान्सबर्ग









