Pune

भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिका 2025: संपूर्ण वेळापत्रक, संघ आणि ठिकाणे

भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिका 2025: संपूर्ण वेळापत्रक, संघ आणि ठिकाणे

भारतीय क्रिकेट संघ 19 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळत आहे. आज, शनिवार 8 नोव्हेंबर रोजी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा टी-20 सामना खेळला जाईल. यानंतर टीम इंडिया मायदेशी परत येईल.

साउथ आफ्रिकेचा भारत दौरा: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आज 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली गेली. अंतिम सामन्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहे, परंतु विश्रांतीनंतर लगेचच भारतीय संघाला साउथ आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमधील मालिका होईल.

साउथ आफ्रिकेचा भारत दौरा: तारीख आणि वेळापत्रक

साउथ आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर 14 नोव्हेंबर 2025 पासून येईल आणि हा दौरा 19 डिसेंबर 2025 पर्यंत चालेल. या काळात टीम इंडिया आणि साउथ आफ्रिका एकूण 10 सामने खेळतील — 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20.

भारत-साउथ आफ्रिका कसोटी मालिका

  • कसोटी मालिका 
    • पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर, कोलकाता
    • दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर, गुवाहाटी
  • एकदिवसीय मालिका
    • पहिला एकदिवसीय: 30 नोव्हेंबर, रांची
    • दुसरा एकदिवसीय: 3 डिसेंबर, रायपूर
    • तिसरा एकदिवसीय: 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
  • टी-20 मालिका
    • पहिला टी-20: 9 डिसेंबर, कटक
    • दुसरा टी-20: 11 डिसेंबर, न्यू चंदीगड
    • तिसरा टी-20: 14 डिसेंबर, धर्मशाला
    • चौथा टी-20: 17 डिसेंबर, लखनऊ
    • पाचवा टी-20: 19 डिसेंबर, अहमदाबाद

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ वेगवान, आक्रमक आणि युवा खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील, जे 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाचे असेल.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाशदीप.

Leave a comment