पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल आणि आसामच्या दोन दिवसीय दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल आणि आसामच्या दोन दिवसीय दौर्‍यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांच्या दोन दिवसीय दौर्‍यावर रवाना झाले आहेत. दौऱ्याच्या कालावधीत ते दोन्ही राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री आसाममधील नागांव येथे काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. हा प्रकल्प सुमारे ८६ किलोमीटर लांबीचा असून तो पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प म्हणून विकसित केला जात आहे. या अंतर्गत काजीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा ३५ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड वाइल्डलाईफ कॉरिडॉर आणि २१ किलोमीटर लांबीचा बायपास विभाग समाविष्ट आहे.

पश्चिम बंगालमध्ये, प्रधानमंत्री शनिवारी दुपारी सुमारे १.४५ वाजता मालदा येथे जाहीर सभेला संबोधित करतील. या कार्यक्रमात ते ₹३,२५० कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील. याच कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चार नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. या गाड्या न्यू जलपाईगुडी–नागरकोइल, न्यू जलपाईगुडी–तिरुचिरापल्ली, अलीपुरद्वार–एसएमव्हीटी बेंगळुरू आणि अलीपुरद्वार–मुंबई (पनवेल) मार्गांवर धावतील.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रधानमंत्री गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियममध्ये आयोजित बोडो सांस्कृतिक महोत्सव ‘बागुरुंबा’ कार्यक्रमात सहभागी होतील.

रविवारी प्रधानमंत्री आसाममधील नागांव जिल्ह्यातील कालियाबोर येथे सुमारे ₹६,९५० कोटी खर्चाच्या काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. याच दिवशी आसाममध्ये आणखी दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. या गाड्या गुवाहाटी (कामाख्या)–रोहतक आणि डिब्रुगढ–लखनौ (गोमती नगर) मार्गांवर धावतील.

पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री सिंगूर येथे सुमारे ₹८३० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यासोबतच राधिकापुर–एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस आणि बालुरघाट–एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस या एलएचबी कोचयुक्त दोन नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

याशिवाय पश्चिम बंगालमध्ये चार रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. यामध्ये बालुरघाट–हिली नवीन रेल्वे लाईन, न्यू जलपाईगुडी येथील पुढील पिढीचे फ्रेट मेंटेनन्स केंद्र, सिलीगुडी लोको शेडचे आधुनिकीकरण आणि जलपाईगुडी जिल्ह्यातील वंदे भारत ट्रेन मेंटेनन्स सुविधेचे उन्नयन यांचा समावेश आहे.

 

Leave a comment