Apple iOS 26.3 अपडेटमध्ये ‘Limit Precise Location’ नावाचे नवीन प्रायव्हसी फीचर सादर करण्यात येणार आहे. या फीचरमुळे मोबाइल नेटवर्क कॅरियरकडून वापरकर्त्याची अत्यंत अचूक लोकेशन ट्रॅक करण्याची क्षमता मर्यादित होईल.
Apple कडून सांगण्यात आले आहे की हे फीचर iOS 26.3 सह रोलआउट करण्यात येईल आणि iPhone व iPad वापरकर्त्यांना अधिक प्रायव्हसी नियंत्रण मिळेल. फीचर सक्रिय केल्यानंतर नेटवर्क कॅरियरला वापरकर्ता नेमक्या कोणत्या पॉइंटवर आहे याची माहिती मिळणार नाही.
सध्या मोबाइल टॉवरच्या आधारे सिम कंपनी वापरकर्त्याची अचूक भौगोलिक स्थिती ओळखू शकते. नवीन फीचर लागू झाल्यानंतर कॅरियरला केवळ वापरकर्ता कोणत्या परिसरात किंवा क्षेत्रात आहे याचीच माहिती उपलब्ध होईल.

Apple ने स्पष्ट केले आहे की या प्रायव्हसी फीचरमुळे नेटवर्क सिग्नल, इंटरनेट वेग किंवा कॉल गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच इमर्जन्सी कॉल दरम्यान आवश्यक असलेला लोकेशन डेटा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील.
हे फीचर सर्व iPhone आणि iPad डिव्हाइसवर उपलब्ध होणार नाही. सध्या ते iPhone Air, iPhone 16e आणि M5 iPad Pro च्या सेलुलर व्हेरिएंटवर कार्य करेल.
या डिव्हाइस मध्ये Apple चे C1 किंवा C1X मॉडेम वापरण्यात आले आहेत, जे या तंत्रज्ञानाला सपोर्ट करतात. फीचर वापरण्यासाठी डिव्हाइसवर iOS 26.3 किंवा iPadOS 26.3 अपडेट इंस्टॉल असणे आवश्यक असून ते Settings मधील Cellular मेनूमधून सक्रिय करता येईल.








