भीष्म पितामह यांचे पाच चमत्कारी बाण - महाभारत कथा
हे त्या वेळची गोष्ट आहे, जेव्हा कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध चालू होते. पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने युद्ध लढत होते, पण कौरवांचा सर्वात मोठा भाऊ दुर्योधनाला वाटत होते की भीष्म पितामह पांडवांना नुकसान पोहोचवू इच्छित नाही. दुर्योधनाचे मत होते की पितामह भीष्म खूप शक्तिशाली आहेत आणि पांडवांना मारणे त्यांच्यासाठी खूप सोपे आहे.
याच विचारात मग्न असलेला दुर्योधन भीष्म पितामहांच्या जवळ गेला. दुर्योधन पितमहला म्हणाला की, ‘तुम्ही पांडवांना मारू इच्छित नाही, म्हणूनच तुम्ही कोणत्याही शक्तिशाली शस्त्राचा उपयोग करत नाही.’ दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म म्हणाले, “जर तुला असे वाटत असेल, तर मी उद्याच पाचही पांडवांना मारून टाकेन. माझ्याकडे पाच चमत्कारी बाण आहेत,
ज्यांचा उपयोग मी उद्या युद्धात करेन.” भीष्म पितामहांचे बोलणे ऐकून दुर्योधन म्हणाला, “माझा तुमच्यावर विश्वास नाही, म्हणून तुम्ही हे पाचही चमत्कारी बाण मला द्या. मी ते माझ्या खोलीत सुरक्षित ठेवीन.” भीष्मांनी ते पाचही बाण दुर्योधनाला दिले.
दुसरीकडे श्रीकृष्णाला या गोष्टीची माहिती मिळाली. त्यांनी अर्जुनाला याबद्दल सांगितले. हे ऐकून अर्जुन घाबरला आणि या संकटातून कसे वाचायचे, याचा विचार करू लागला. श्रीकृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली की, ‘एकदा तू दुर्योधनाला गंधर्वापासून वाचवले होतेस, तेव्हा दुर्योधन तुला म्हणाला होता की या उपकाराच्या बदल्यात तू भविष्यात माझ्याकडून काहीही मागू शकतोस.’
आता हीच योग्य वेळ आहे, तू दुर्योधनाकडून ते पाच चमत्कारी बाण मागून घे. याच प्रकारे तू आणि तुझ्या भावांचे प्राण वाचू शकतात. अर्जुनाला श्रीकृष्णाचा सल्ला अगदी योग्य वाटला. त्याला दुर्योधनाचे दिलेले वचन आठवले. असे म्हटले जाते की त्या काळात सगळेच आपले दिलेले वचन नक्की पाळायचे. वचन तोडणे नियमाच्या विरोधात मानले जात होते. अर्जुनाने जेव्हा दुर्योधनाला त्याचे दिलेले वचन आठवण करून दिली आणि पाच बाण मागितले, तेव्हा दुर्योधन नकार देऊ शकला नाही.
दुर्योधनाने आपले वचन पाळले आणि ते बाण अर्जुनाला दिले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या भक्त पांडवांचे रक्षण केले.