एकदा काय झालं, एक भुकेलेला कोल्हा अन्नाच्या शोधात जंगलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला. अचानक, जोरदार वारा आला आणि एका झाडाच्या मागे पडलेला ढोल वाजू लागला. शांत जंगलात आवाज घुमला आणि कोल्हा घाबरला. त्याने विचार केला, "नक्कीच झाडाच्या मागे एखादा भयानक प्राणी लपलेला असणार. त्याने मला पकडण्याआधीच मी इथून पळायला पाहिजे."
मग त्याने विचार केला, "मी न पाहता कसं म्हणू शकतो की झाडाच्या मागे एखादा धोकादायक प्राणी आहे?" असा विचार करून कोल्हा परत फिरला आणि त्याने झाडाच्या मागे पाहिलं. त्याला आढळलं की तो ज्याला घाबरत होता, तो फक्त एक साधा ढोल होता. हे पाहून कोल्ह्याला हायसं वाटलं आणि तो अन्नाच्या शोधात पुढे निघून गेला.
शिकवण
या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की, जे लोकं साहसी असतात तेच आपल्या कामात यशस्वी होतात.
```