विमेंस प्रीमियर लीगच्या 20व्या आणि अंतिम लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा पाच विकेट्सने पराभव करत एलिमिनेटरसाठी पात्रता मिळवली.
वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूपी वॉरियर्सने 20 षटकांत 8 बाद 122 धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंग पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाली. मधल्या फळीत दीप्ती शर्मा हिने 24 धावा केल्या, तर सिमरन शेख हिने 14 चेंडूंत 22 धावांची खेळी केली. शेवटी शिखा पांडे हिने नाबाद 23 धावा करत संघाची धावसंख्या 122 पर्यंत नेली.
![]()
दिल्ली कॅपिटल्सकडून मारिझान कॅपने तीन विकेट्स घेतल्या, तर छिनेल हेनरीने दोन विकेट्स मिळवल्या. इतर गोलंदाजांनीही धावांवर नियंत्रण ठेवत यूपी वॉरियर्सला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.
123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 18.4 षटकांत पाच विकेट्स गमावत विजय मिळवला. पाठलागात जेमिमा रोड्रिग्सने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने एलिमिनेटरमध्ये स्थान निश्चित केले, तर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.









