टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या तयारीला धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने स्पष्ट केले की कमिन्स त्याच्या जुन्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती आणि पुनर्वसनाचा सल्ला दिल्याने तो संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध राहणार नाही.
पॅट कमिन्सला पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेतही खेळता आले नव्हते. 7 फेब्रुवारीपर्यंत तो तंदुरुस्त होईल या अपेक्षेने त्याचा सुरुवातीच्या संघात समावेश करण्यात आला होता. मात्र वैद्यकीय मूल्यमापनानंतर त्याला संपूर्ण स्पर्धेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
![]()
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या जागी बेन ड्वारशिसचा संघात समावेश केला आहे. ड्वारशिस हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून तो खालच्या फळीत फलंदाजीही करू शकतो.
याशिवाय, मॅथ्यू रेनशॉचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रेनशॉने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध टी20 सामन्यात पदार्पण केले होते. तो सलामीवीर मॅथ्यू शॉर्टच्या जागी संघात आला आहे.








