माल्टा सरकार आणि युनिव्हर्सिटी ऑफ माल्टा यांच्या सहकार्याने OpenAI ने ‘AI for All’ अभियान सुरू केले असून, सरकारी AI literacy कोर्स पूर्ण करणाऱ्या नागरिकांना एका वर्षासाठी मोफत ChatGPT Plus सदस्यत्व दिले जाणार आहे. OpenAI नुसार, ही कंपनीची राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणारी पहिली भागीदारी मानली जात आहे.
OpenAI ने माल्टा सरकारसोबत ‘AI for All’ अभियान सुरू केले आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूक करणे आहे.
या कार्यक्रमांतर्गत माल्टातील जे नागरिक सरकारी AI literacy कोर्स पूर्ण करतील, त्यांना एका वर्षासाठी ChatGPT Plus ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ही सुविधा परदेशात राहणाऱ्या माल्टाच्या नागरिकांसाठीही उपलब्ध असेल.
या अभियानाची अंमलबजावणी युनिव्हर्सिटी ऑफ माल्टा यांच्या सहकार्याने केली जाणार आहे. OpenAI च्या माहितीनुसार, ही राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणारी कंपनीची पहिली मोठी भागीदारी आहे.
या कोर्समध्ये AI चा व्यावहारिक वापर, जबाबदार वापर आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल. कोर्स पूर्ण केल्यानंतर पात्र नागरिकांना प्रीमियम ChatGPT Plus योजना मोफत दिली जाईल.
![]()
भारतीय किंमतीनुसार पाहता, ChatGPT Plus चे शुल्क सुमारे 2,000 रुपये प्रति महिना आहे.
रिपोर्टनुसार, OpenAI संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनी तेथे StarGate UAE इन्फ्रास्ट्रक्चर भागीदारीद्वारे AI सेवांचा विस्तार करण्यावर काम करत आहे.
भविष्यात UAE मधील नागरिकांनाही मोफत AI सदस्यत्व योजना उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतामध्येही अलीकडील काळात AI कंपन्यांनी प्रीमियम योजना मोफत किंवा भागीदारी मॉडेलद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. Google ने Jio सोबत भागीदारीत काही AI सेवा उपलब्ध केल्या होत्या, तर Perplexity ने Airtel वापरकर्त्यांना मोफत Pro योजना दिली होती.
OpenAI ने देखील काही योजना मर्यादित कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, हे प्रस्ताव सरकारी भागीदारीऐवजी खासगी कंपन्यांच्या सहकार्याने देण्यात आले होते.








