पुरुषांमध्ये कर्करोगाचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या लक्षणे - पुरुषांना कर्करोगाचा धोका जास्त असतो, त्याची लक्षणे काय आहेत ते जाणून घ्या
कर्करोग’ हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण होते, कारण एका क्षणाला कोरोना व्हायरसवर उपचार सापडले, पण कर्करोगावर अजूनही उपचार सापडलेला नाही आणि यापुढे मिळेल की नाही, हे सांगणे कठीण आहे. पण योग्य माहिती आणि उपचार घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी आणि लोकांमध्ये या भयंकर रोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. जनजागृती मोहीम असूनही दरवर्षी कर्करोगामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. वेब एमडीच्या रिपोर्टनुसार, पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत कर्करोगाचा धोका जास्त असतो.
पुरुषांमध्ये होणारे कर्करोग कोणते आणि त्याची लक्षणे काय आहेत, ते जाणून घेऊया.
कर्करोग म्हणजे काय? What is cancer
मानवी शरीर असंख्य पेशींपासून बनलेले आहे आणि या पेशींमध्ये सतत विभाजन होत असते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यावर शरीराचे पूर्ण नियंत्रण असते. पण कधीकधी जेव्हा शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागातील पेशींवरील शरीराचे नियंत्रण बिघडते आणि पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा त्याला कर्करोग म्हणतात.
कर्करोगाची सुरुवात कशी होते? How does cancer start
मानवी शरीरात जेव्हा पेशींमधील जनुकात बदल होऊ लागतात, तेव्हा कर्करोगाची सुरुवात होते. जनुकात बदल होण्यासाठी कोणतेही विशेष कारण नसते, ते स्वतःहून बदलू शकतात किंवा इतर कारणांमुळे देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ, गुटखा-तंबाखू सारख्या मादक पदार्थांचे सेवन करणे, अतिनील किरणे किंवा रेडिएशन इत्यादी कारणांमुळे कर्करोग होऊ शकतो. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की, कर्करोग शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच्या पेशींना नष्ट करतो, पण कधीकधी कर्करोगाच्या पेशींना रोगप्रतिकारशक्ती निष्प्रभ ठरते आणि व्यक्तीला कर्करोगासारखा असाध्य रोग होतो.
शरीरात कर्करोगाच्या पेशी जसजशा वाढत जातात, तसतशी ट्यूमर म्हणजे एक प्रकारची गाठ तयार होते. जर यावर योग्य वेळी उपचार केले नाही, तर ते संपूर्ण शरीरात पसरते.
कोलोरेक्टल कर्करोग Colorectal cancer
कोलोरेक्टल कर्करोग मोठ्या आतड्यामध्ये होणारा कर्करोग आहे. पुरुषांसाठी हा तिसरा सर्वात धोकादायक कर्करोग आहे. 100,000 पैकी सुमारे 53,000 लोकांना कोलोरेक्टल कर्करोग आहे. 2007 मध्ये, सुमारे 27,000 लोकांचा मृत्यू या कर्करोगामुळे झाला होता.
कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे Colorectal cancer symptoms
कोलोरेक्टल कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे खूप कठीण आहे. पण धोका वाढल्यानंतर, पोटदुखी, अशक्तपणा आणि वजन झपाट्याने कमी होणे यासारख्या समस्या येतात.
मूत्राशयाचा कर्करोग Bladder cancer
पुरुषांमध्ये होणारा हा चौथा सर्वात धोकादायक कर्करोग आहे. एक लाख कर्करोगग्रस्तांपैकी सुमारे 36 रुग्ण या कर्करोगाने ग्रस्त आहेत, ज्यापैकी सुमारे आठ जणांचा मृत्यू होतो.
मूत्राशयाच्या कर्करोगाची लक्षणे Symptoms of bladder cancer
मूत्राशयाच्या कर्करोगामुळे लघवीतून रक्त येऊ लागते. लघवीतील रक्त रक्ताच्या गुठळ्यांसारखे दिसते. लघवी करताना खूप जळजळ जाणवते.
प्रोस्टेट कर्करोग Prostate cancer
पुरुषांमध्ये जननेंद्रियाच्या भागात होणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाचा धोका सर्वात जास्त असतो. फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर प्रोस्टेट कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू होतात. सीडीसीच्या रिपोर्टनुसार, 2007 मध्ये आढळलेल्या सुमारे 100,000 कर्करोगग्रस्तांपैकी सुमारे 29,000 लोकांचा मृत्यू प्रोस्टेट कर्करोगामुळे झाला होता.
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे Symptoms of prostate cancer
प्रोस्टेट कर्करोगामुळे माणसाला लघवी करताना खूप त्रास होतो. लघवी गळू लागते आणि हाडांमध्ये दुखणे वाढते.
त्वचेचा कर्करोग Skin cancer
पुरुषांसाठी त्वचेचा कर्करोग पाचवा सर्वात धोकादायक कर्करोग आहे. एक लाख कर्करोगग्रस्तांपैकी सुमारे 27 लोकांना हा कर्करोग होतो, ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू होतो.
त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे Symptoms of skin cancer
यामध्ये माणसाच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. त्वचेवर लहान पुरळ येऊ लागतात. म्हणून, त्वचेवर नको असलेले डाग किंवा गाठी दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग Lungs cancer
जगभरात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे (लंग कॅन्सर) सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. 2007 च्या आकडेवारीनुसार, सुमारे 88,000 लोकांचा मृत्यू याच भयंकर रोगामुळे झाला होता.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे Symptoms of lungs cancer
फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये थुंकीमध्ये रक्त आणि छातीत दुखणे यासारख्या समस्या दिसून येतात. फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यामुळे माणसाला श्वास घेण्यास खूप त्रास होतो.