पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायलच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध Special Strategic Partnership पर्यंत उन्नत करण्याच्या प्रक्रियेकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इस्रायलच्या संसदेचे भवन Knesset भारतीय तिरंग्याच्या रंगांनी प्रकाशित करण्यात आले. Knesset चे स्पीकर अमीर ओहाना यांनी याचे छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत भारत-इस्रायल भागीदारीसाठी हे Symbolic Tribute असल्याचे म्हटले.
इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu स्वतः विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत. विमानतळावरील औपचारिक स्वागत समारंभानंतर दोन्ही नेत्यांमध्ये One-to-One Meeting होणार आहे. त्यानंतर प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा आयोजित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची जेरुसलेममध्ये भारतीय समुदायातील सदस्यांशी भेट होणार असून त्यानंतर ते Knesset ला संबोधित करणार आहेत. कोणत्याही परदेशी नेत्याला Knesset मध्ये संबोधनाची संधी मिळणे हा विशेष सन्मान मानला जातो.
सायंकाळी पंतप्रधान तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून इस्रायलच्या Innovation आणि Startup Ecosystem चे सादरीकरण करण्यात येणार आहे. रात्री पंतप्रधान Netanyahu त्यांच्या सन्मानार्थ Private Dinner आयोजित करणार आहेत.
इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते Yair Lapid यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हिंदी भाषेत पोस्ट करून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. संपूर्ण इस्रायल पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत आणि इस्रायल यांचे संबंध केवळ स्ट्रॅटेजिक नसून गाढ मैत्रीचे बंध असल्याचे त्यांनी म्हटले.

सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात भारत आणि इस्रायल संबंधांना Special Strategic Partnership पर्यंत नेण्याबाबत औपचारिक निर्णय घेण्याची प्रक्रिया पुढे सरकेल. यामुळे संरक्षण, टेक्नोलॉजी, सायबर सिक्युरिटी, कृषी, जल व्यवस्थापन आणि व्यापार या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Advanced Defense Systems च्या Joint Development संदर्भात तसेच गरजेच्या वेळी परस्पर सहाय्य करण्याच्या समजुतीला औपचारिक स्वरूप देण्याचा विचार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलचे अमेरिका आणि जर्मनी यांच्यासोबत असलेल्या संबंधांच्या धर्तीवर हा टप्पा मानला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी जुलै 2017 मध्ये इस्रायलला भेट दिली होती. त्या वेळी दोन्ही देशांच्या संबंधांना Strategic Partnership चा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर नऊ वर्षांनी होत असलेला हा दौरा संबंधांच्या पुढील उन्नतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
भारत आणि इस्रायल अनेक वर्षांपासून संरक्षण आणि टेक्नोलॉजी क्षेत्रात सहकार्य करत आहेत. संरक्षण उपकरणे, क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन टेक्नोलॉजी आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू आहे. व्यापार क्षेत्रातही निर्यात आणि गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन भागीदारीमुळे Free Trade Agreement बाबतच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.










