गाजराचा हलवा बनवण्याची कृती Carrot sweet Recipe
गाजराचा हलवा एक अतिशय उत्कृष्ट मिठाई आहे. खरी चव तर थंडीच्या दिवसात येते. हे बनवणे खूप सोपे आहे. मी तुम्हाला गाजराच्या हलव्याची एक अतिशय सोपी रेसिपी सांगणार आहे, जी आपण घरी बनवलेल्या खव्यासोबत बनवणार आहोत.
गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य Ingredients for Carrot sweet
1 किलो गाजर
250 ग्राम साखर
250 ग्राम मावा
1 टेबल स्पून देशी तूप
10-12 मनुका
12-15 काजू आणि बदाम (बारीक चिरलेले)
1 ½ कप दूध
5-6 लहान वेलची
गाजराचा हलवा बनवण्याची कृती Carrot sweet Recipe
गाजराचा हलवा बनवण्यासाठी तुम्हाला लाल रंगाची मोठी गाजर घ्यायची आहेत.
ही गाजरं सोलून, व्यवस्थित धुवून किसून घ्या.
मावा एका कढईत टाकून, मंद आचेवर भाजून घ्या.
आता किसलेले गाजर कढईमध्ये दूध टाकून उकळण्यासाठी ठेवा.
गाजर मऊ होईपर्यंत शिजवा आणि मग त्यात साखर घाला.
आता गाजर थोडा वेळ ढवळत शिजवा. गाजरामधील पूर्ण रस आटेपर्यंत शिजवा.
आता गाजरात तूप टाकून परतून घ्या आणि मग मनुका, काजू, बदाम टाकून मिक्स करा.
आता भाजलेला मावा पण टाका आणि हलवा 2-3 मिनिटे ढवळत भाजून घ्या.
गॅस बंद करा आणि पिठी वेलची मिक्स करा.
तयार आहे स्वादिष्ट घरगुती गाजराचा हलवा.