खोया काजू बेसनचे स्वादिष्ट लाडू कसे बनवायचे?How to make khoya cashew gram flour laddoo?
तुम्हाला लाडू (Laddu) जास्त आवडत असतील, तर मग घरीच बनवा खोया काजू बेसन लाडू (cashew Besan Laddu). हे खायला खूपच स्वादिष्ट (yummy) असतात आणि बनवायलाही खूप सोपे. चला, तर मग बघूया ते बनवण्याची रेसिपी.
आवश्यक सामग्री Necessary ingredients
25 काजू जाडसर पिसालेले
एक कप बेसन
एक कप खवा/मावा
एक चतुर्थांश कप तूप
अर्धा कप पिठी साखर
एक छोटा चमचा वेलची पूड
बनवण्याची कृती Recipe
एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करा.
नंतर त्यात बेसन घालून हलके सोनेरी होईपर्यंत किंवा सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
त्यानंतर त्यात खवा घालून सतत ढवळत राहा. खवा बेसनामध्ये चांगला मिक्स झाल्यावर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा.
आता गॅस बंद करा आणि मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्या.
त्यात पिठी साखर मिक्स करा आणि चांगले एकजीव करून लाडू वळा.
लाडू बनवून थंड ठिकाणी ठेवा. लाडू जास्त दिवस टिकवणे थोडे कठीण आहे, कारण त्यात खवा घातलेला आहे. त्यामुळे लाडू खराब होऊ शकतात.