स्वादिष्ट रबडी खीर कशी बनवायची ? How to make delicious Rabri Kheer
खीर कोणाला आवडत नाही, आणि त्यातही जर रबडी वाली खीर खायला मिळाली तर? नुसत्या नावानेच तोंडाला पाणी सुटेल अशी ही मिठाई आहे. रबडी खीर. तसं तर ही सुद्धा तांदळापासूनच बनवतात, पण ती बनवण्याची पद्धत खूप वेगळी आणि पौष्टिक आहे. घरी रबडी खीर बनवण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागेल आणि ती कशी बनवायची याची रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेयर करत आहोत. याची चव खूप वेगळी असते.
आवश्यक सामग्री Necessary ingredients
200 ग्राम रबडी
1/2 कप तांदूळ
अर्धा कप साखर (आवश्यकतेनुसार)
1 छोटा चमचा वेलची पावडर
1 छोटा चमचा मनुका
9-10 बदाम (बारीक तुकड्यांमध्ये कापलेले)
9-10 काजू (बारीक तुकड्यांमध्ये कापलेले)
1 लीटर दूध
आवश्यकतेनुसार पाणी
एक मोठा चमचा पिस्त्याचे काप
बनवण्याची विधि Recipe
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवा.
आता तांदळातलं पाणी काढून तांदूळ जाडसर वाटा.
मंद आचेवर कढई गरम करा.
कढई गरम झाल्यावर त्यात दूध टाकून उकळी येऊ द्या.
दुधाला उकळी आली की त्यात भिजवलेले तांदूळ टाका आणि चमच्याने ढवळत राहा.
आता त्यात बारीक चिरलेले काजू, पिस्ता आणि बदाम टाका.
तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स मऊ झाले आणि खीर घट्ट झाली की कढई गॅसवरून खाली उतरवा.
आता त्यात साखर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करा.
खीर थंड झाल्यावर त्यात रबडी टाकून मिक्स करा.
स्वादिष्ट रबडी खीर तयार आहे.