पंजाबी पालक पनीर कसे बनवायचे? जाणून घ्या सोपी रेसिपी How to make Punjabi Palak Paneer? Learn easy recipe
रेस्टॉरंट स्टाईल पंजाबी पालक पनीर रेसिपी. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. त्यात फॉलिक ऍसिड देखील असते, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या मोसमात हिरव्या पालेभाज्या खाण्याची मजाच काही और असते. हिरव्या भाज्या जिथे रक्त वाढवतात, त्याचबरोबर त्यातील फायबरमुळे अन्न पचनासही मदत होते. वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली पालकाची भाजी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल. पण, तुम्ही कधी पंजाबी स्टाईलमध्ये पालक पनीरची भाजी खाल्ली आहे का? ही खायला खूप चविष्ट लागते. चला तर मग, या लेखाद्वारे जाणून घेऊया पंजाबी स्टाईलमध्ये पालक पनीर कसे बनवायचे.
आवश्यक सामग्री Necessary ingredients
पालक चार कप, चिरलेला
200 ग्राम पनीर, चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेले
3 चमचे तेल
1 चमचा आले पेस्ट
मीठ चवीनुसार
2 चमचे मलई
कांद्याच्या पेस्टसाठी 1 कप कांदा
¼ कप स्लाईस केलेले काजू
5 हिरव्या मिरच्या
1 चमचा लसूण पेस्ट
¼ कप टोमॅटो, बारीक चिरलेला
¼ चमचा काळे मीठ
1 चमचा कसुरी मेथी
1 चमचा गरम मसाला
1 कप पाणी
पंजाबी पालक पनीर बनवण्याची कृती How to make Punjabi Palak Paneer
एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा, काजू, हिरवी मिरची आणि 1 कप पाणी घेऊन 15 मिनिटे शिजवून घ्या. जेव्हा कांदा मऊ होईल आणि पाणी 80 टक्क्यांपर्यंत आटेल, तेव्हा ते थंड होण्यासाठी ठेवा. आता पालक धुवून थोड्या पाण्यात मध्यम आचेवर 5 मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर उकडलेला पालक थंड पाण्याने धुवा. मग कांदा आणि इतर सामग्री मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून बाजूला ठेवा. नंतर त्याच मिक्सरमध्ये पालकही पाणी न टाकता बारीक करून घ्या.
आता एक मोठा पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करा. मग त्यात आले-लसूण पेस्ट टाकून 1 मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो टाकून 2 ते 3 मिनिटे शिजवा. आता कांद्याची पेस्ट टाकून 2 मिनिटे परतून घ्या. कांद्याची पेस्ट ब्राऊन होऊ नये, याची काळजी घ्या. मग त्यात पालकाची पेस्ट टाकून उकळू द्या. त्यानंतर त्यात काळे मीठ, कसुरी मेथी, गरम मसाला आणि मीठ टाकून मिक्स करा.
आता त्यात पनीरचे तुकडे टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा. तुम्ही पनीरला हलके फ्राय देखील करू शकता. जर ग्रेव्ही घट्ट झाली तर त्यात थोडे पाणी टाका आणि 2 मिनिटे मंद आचेवर शिजवा. नंतर गॅस बंद करून वरून मलई टाका. तुमचे पालक पनीर तयार आहे, आता तुम्ही ते सर्व्ह करा.